परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये कुस्ती मॅटचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मॅट खरेदी करण्यासाठी बहुमोल सहकार्य करणारे श्री किशोरजी मानकर, सौ स्नेहा मराठे, श्री प्रशांत जाधव, श्री मंदार शेलार, श्री वैभव पवार,श्री दिलावर पटाईत, सौ वैशाली उंडरे हे मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य श्री अभय शेठ चितळे, श्री तुषारजी गोखले, श्री राजूशेठ कानडे, त्याचबरोबर पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ अहिरे मॅडम, पालक शिक्षक संघाचे सर्व प्रतिनिधी, प्राथमिक शाळा होडेवाडीचे शिक्षक व कुस्ती मार्गदर्शक श्री मदने सर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कापडी सर, शिशुविहार विभाग प्रमुख सौ वारे मॅडम , शिक्षक प्रतिनिधी श्री आंबवकर सर ,पालक त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कुस्तीच्या मॅटचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर चिपळूण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुयश मिळालेल्या हर्षवर्धन मदने, शमिका पवार ,गार्गी मोरे ,हर्षदा चव्हाण, मानस सावंत, ईश्वरी कदम, शैलेश पवार तोझीम पटाईत, अक्षय खरात या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कुस्ती प्रशिक्षक श्री मदने सर, क्रीडा शिक्षक श्री यादव सर, आणि या सर्व देणगीदारापर्यंत पोहचून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे श्री काणेकर सर यांचाही या कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री किशोरजी मानकर यांनी विद्यार्थ्यांना गरुडाप्रमाणे कुस्तीमध्येही झेप घेण्याचे आवाहन केले. परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री अभय शेठ चितळे यांनीही परशुराम एज्युकेशन सोसायटी तर्फे सर्व देणगीदारांना धन्यवाद देऊन कुस्ती स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. प्राथमिक शाळा होडेवाडीचे शिक्षक व कुस्ती प्रशिक्षक श्री मदने सर यांनीही आपल्या मनोगतामधून कुस्तीचे मानवी जीवनामधील व करिअर मधील महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे क्रीडाशिक्षक विज्ञान शिक्षक व समुपदेशक श्री प्रदीपकुमार यादव सर यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मिळाले.
