RATNAGIRI | गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. आज रत्नागिरी मध्ये सकाळपासूनच धुक्याची दुलई वातावरणात पसरल्याचे चित्र दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. धूक्याच्या दुलईमुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. हिवाळ्यामध्ये कोकणामध्ये पावटा, कडवे , कुळीथ यांसारख्या पिकांची शेती केली जाते या पिकांना हे पोषक वातावरण आहे. दाट पडणाऱ्या धूक्यामुळे विहंगम आणि अल्हाददायक वातावरणाचा नजारा रत्नागिरीच्या किनारपट्टी व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे.
