ऍड. शीतल चव्हाण यांना कास्य पदक तर कन्या स्वरा चव्हाण हिला रौप्य पदक.!

(सचिन बिद्री:धाराशिव)

थायलंडच्या चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (COPA) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धाराशिवच्या उमरग्याचा झेंडा उंचावला गेला आहे.

या स्पर्धेचे आयोजन आखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS), ग्लोबल कौन्सिल फॉर आर्ट अँड कल्चर (GCAC) आणि युनेस्को (UNESCO) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. दि. 25 ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 250 हून अधिक कलावंतांनी विविध वयोगटांतील विभागांत सहभाग घेतला होता.

उमरग्याच्या ऍड. शीतल चव्हाण यांनी इथनिक एकल नृत्यप्रकारात “शिव तांडव” आणि “बम भोले” या गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर करत कास्य पदक पटकावले. तर त्यांची कन्या स्वरा चव्हाण हिने ज्युनिअर गटातील कॉन्टेम्पररी समूह नृत्यप्रकारात नरसिंहा चित्रपटातील भक्तिपर गाण्यावर सादरीकरण करून रौप्य पदक मिळवले.

पारितोषिक वितरण समारंभ दि. 28 ऑक्टोबर रोजी पटाया येथील हॉटेल ले बाली येथे पार पडला.

या दोघींच्या यशाने उमरग्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, उमरग्याचे नाव थायलंडच्या भूमीवर झळकवणाऱ्या चव्हाण बाप-लेकीचे कौतुक नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *