- “कामावर विश्वास ठेवणारा नेता: शिक्षण, सेवा आणि विकासाचा नवा अध्याय.”

प्रतिनिधी : आयुब शेख | धाराशिव
धाराशिव: धाराशिव शहरातील राजकारण पुन्हा एकदा कामावर आणि निस्वार्थ समाजसेवेवर आधारित व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रांत अविरत कार्य करणारे सय्यद नादेरुल्लाह हुसैनी (कालीमुल्लाह) यांनी ‘जनतेचा नगरसेवक पुन्हा मैदानात!’ या घोषणेसह प्रभाग क्रमांक १७ मधून धाराशिव नगरपरिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे प्रभाग १७ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.
राजकीय प्रवास: दोन कार्यकाळाचा भक्कम आधार
हुसैनी सरांनी यापूर्वी दोन कार्यकाळात (२००६ ते २०१६) नगरसेवक म्हणून धाराशिवकरांचा विश्वास जिंकला आहे. २००६ मध्ये अपक्ष आणि २०११ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी बंधकम सभापती, स्टँडिंग कमिटी सदस्य, आणि सध्या रुग्ण कल्याण समिती (RKS) सदस्य अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
“काम करणारा नगरसेवक!” हेच त्यांचे ओळखपत्र असून, त्यांनी स्वखर्चातून वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने काम केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान
शिक्षण हेच समाज उभारणीचं खरं शस्त्र आहे, यावर विश्वास ठेवून हुसैनी सरांनी शेकडो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणखर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून भागवला, ज्यामुळे आज हे विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. मुस्लिम समाजात शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे.
निस्वार्थ समाजसेवेची साखळी
हुसैनी सर केवळ राजकारणी नसून ते एक समर्पित समाजसेवक आहेत. २००९ मध्ये ‘हज़रत ख़्वाजा शमसुद्दीन गाज़ी रह. वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना करून त्यांनी कार्याची मोठी शृंखला निर्माण केली.
- ७०० हून अधिक सामूहिक विवाह यशस्वीरीत्या पार पाडले.
- २०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
- कोरोना काळात मोफत अॅम्ब्युलन्स सेवा पुरवली.
- ३ एकर जमीन मुस्लिम स्मशानभूमीसाठी दान केली.
- पाणीटंचाईग्रस्त भागांत स्वखर्चातून बोरवेल व पाणीपुरवठा योजना राबवल्या.
शांतता आणि ऐक्याचा सेतू
हुसैनी सर हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, गावातील वाद, जमिनीचे तंटे आणि भावकीचे प्रश्न सोडवणारे ‘न्याय-निवारा करणारे नेते’ म्हणून ओळखले जातात. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला असून, दोन्ही समाजांत त्यांना “शांततेचे दूत” म्हणून मान मिळतो.
विरोधकांना आव्हान: ‘विकास राजकारणावर नव्हे, कामावर व्हायला हवा’
शहर विकासाचे ‘स्मार्ट, स्वच्छ आणि शिक्षणयुक्त धाराशिव’ हे व्हिजन घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. “दहा वर्षे आश्वासनं दिली पण काम काहीच केलं नाही,” असा थेट प्रहार करत, “आमचं काम हेच आमचं ओळखपत्र आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
मतदारांना आवाहन करताना त्यांनी म्हटले आहे की, “या निवडणुकीत धर्म, जात बाजूला ठेवा — काम आणि कार्य पाहा. शिक्षण, विकास आणि समाजसेवेचं राजकारण करणाऱ्यांनाच निवडा.”
हुसैनी सरांच्या उमेदवारीमुळे प्रभाग १७ मध्ये ‘विजय निश्चित’ असल्याची भावना जनतेत असून, काम करणाऱ्या नेत्याला पुन्हा संधी देण्याचा निर्धार धाराशिवकरांनी केल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशीव.
