
(सचिन बिद्री: उमरगा-धाराशिव)
धाराशिव: जिल्ह्याचे युवा नेते तथा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यात काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय मुसंडी मारली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि इतर संघटनांतील महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.
उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात पक्ष प्रवेश व पदनियुक्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि उमरगा-लोहारा विधानसभा प्रभारी कल्याण पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऍड. धीरज पाटील आणि जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्लेष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
👥 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये समावेश
यावेळी माजी नगरसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते ख्वाजा मुजावर, माजी नगरसेविका जयश्री संजय चव्हाण, संभाजी ब्रिगेडच्या रेखाताई सूर्यवंशी व ज्योतीताई रजपूत, तसेच सचिन सुतके, महेश गायकवाड, योगेश माने यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे उमरगा व लोहारा तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठी बळकटी मिळाली असून, आगामी काळात पक्षाचे बळ वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
🎯 उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास अर्जुन बिराजदार, विजय वाघमारे, एम. ओ. पाटील, नानाराव भोसले, मधुकर यादव, संजय सरवदे, विजय दळगडे, शामसुंदर तोरकडे, ऍड. दिलीप सगर, ऍड. पोतदार, अभिषेक औरादे, सतीश जाधव, राहुल वाघ, ऍड. सयाजी शिंदे, याकूब लदाफ, ऍड. एस. पी. इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. अश्लेष मोरे यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी दिसून आले.
प्रतिनिधी सचिन बिद्री,
एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशीव.
