प्रभाग क्रमांक २ मधून संभाजी शंकर कांबळे यांची जोरदार दावेदारी!

✍️ प्रतिनिधी : आयुब शेख

नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून मागासवर्गीय पुरुष आरक्षित जागेवरून संभाजी शंकर कांबळे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा असून, ते मतदारसंघात संघटनबांधणी आणि जनसंपर्क मोहिमेला गती देताना दिसत आहेत.

संभाजी कांबळे हे २००१ ते २००६ या कालावधीत नगरपरिषदेचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी संगीता कांबळे यांनी देखील नगरपरिषदेतील विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पती-पत्नी दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय असून, समाजकार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असून, सध्या ते मागासवर्गीय समाज उपाध्यक्ष (तालुका) या पदावर कार्यरत आहेत. ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत असून, त्यांच्या कामाची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतली जात आहे. यापूर्वी ते माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत.

शहर विकासासाठी योगदान :

संभाजी कांबळे यांनी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना पुढे नेल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

🔹 शहर विकासाचा विजन —
“नळदुर्ग शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुसज्ज बनवणे” हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.

🔹 स्वच्छतेचा संकल्प —
कचरा व्यवस्थापन, नालेसफाई आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर ते विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

🔹 राजकीय परिपक्वता आणि अनुभव —
दीर्घ राजकीय प्रवासामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव, लोकसंपर्क आणि संघटनशक्तीचा उत्तम मिलाफ आहे.

🔹 स्पष्टवक्तेपणा आणि जाहीर आव्हान —
संभाजी कांबळे हे स्पष्टवक्ते आणि ठाम भूमिकेचे नेते म्हणून ओळखले जातात.
“विकास रोखणाऱ्यांना जनता आता उत्तर देईल,” असे ते मतदारसंघातील सभांमधून ठामपणे सांगतात.

🔹 इंदिरानगर परिसरातील न्यायासाठी लढा —
इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या कबाल्याच्या (घरजमिनीच्या) प्रकरणात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे.

🔹 मतदारांना आवाहन —
“नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझे संपूर्ण आयुष्य झटले आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवावा आणि मला सेवेसाठी संधी द्यावी,” असे ते म्हणतात.


🔸 सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श —

शहरातील सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या सुख-दुःखात संभाजी कांबळे नेहमीच सहभागी झाले आहेत. कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाचा भेदभाव न करता त्यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. सामाजिक सलोखा, बंधुता आणि परस्पर आदर या मूल्यांना त्यांनी आपल्या कार्यातून प्रोत्साहन दिले आहे.

धार्मिक सण, उत्सव, संकट किंवा आपत्ती — प्रत्येक प्रसंगी त्यांनी दोन्ही समाजांच्या लोकांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरात ते “सर्व समाजांना जोडणारे लोकनेते” म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांत त्यांच्याबद्दल विश्वास, आपलेपणा आणि मान निर्माण झाला आहे.


शहरात त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, दीर्घ अनुभव, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे विरोधकांचे गणित कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *