• नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक २०२५ : रणे घराण्याचा पुन्हा झेंडा फडकणार..!
  • १९५४ पासूनचा सात दशकांचा राजकीय वारसा – अनिता जनार्दन रणे भाजपकडून प्रभाग १० मधून इच्छुक..!

🖋️ प्रतिनिधी : आयुब शेख | नळदुर्ग

नळदुर्ग शहराचं राजकारण म्हटलं की रणे हे नाव आदराने घेतलं जातं.
सन १९५४ मध्ये झालेल्या पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीत विश्वनाथ रणे यांनी विजय मिळवून रणे घराण्याचा राजकीय झेंडा नगरपरिषदेवर फडकवला.
त्या पहिल्या विजयापासून आजपर्यंत — तब्बल सात दशकं — रणे कुटुंबाने नगरसेवक पदापासून शहराच्या विकासापर्यंत ठसा उमटवला आहे.

सात दशकांचा “रणे” कुटुंबाचा वारसा

विश्वनाथ रणे यांनी सलग २० वर्ष नगरसेवक म्हणून कारभार केला.
त्यानंतर शंकरराव राणे यांनी तब्बल २५ वर्ष नगरसेवकपद भूषवून नळदुर्ग शहराच्या विकासाला गती दिली.
यानंतर जनार्दन राणे यांनी १० वर्ष नगरसेवक म्हणून कार्य करत रणेंचा जनाधार आणखी बळकट केला.

या प्रतिष्ठित परंपरेचा नवा अध्याय आता अनिता जनार्दन रणे यांच्या माध्यमातून सुरू होत आहे.
त्या प्रभाग क्रमांक १० (अनुसूचित जाती आरक्षित जागा) मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असून, शहरातील राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीची चर्चा जोमात आहे.

प्रभाग १० मधील विकासकामांचा ठसा

प्रभाग क्रमांक १० मध्ये रणेंनी गेल्या काही वर्षांत आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुनील चव्हाण यांच्या सहकार्याने अनेक विकासकामं पूर्ण केली आहेत.
रस्ते, गटार, पाणीपुरवठा, वाचनालय, तसेच सामाजिक सुविधांच्या उभारणीत रणेंचा थेट सहभाग राहिला आहे.

पूर्वी विश्वास राणे हे काँग्रेस पक्षात सक्रिय होते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात.
मात्र, विकासाभिमुख राजकारण आणि नेतृत्वाचा प्रभाव पाहून त्यांनी आमदार राणाजगजितसिंग पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेशानंतर रणे कुटुंबाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले आहे.

समाजकार्यात सातत्य व कौटुंबिक सहभाग

विश्वास राणे यांच्या पुढाकाराने “जनहित सामाजिक संस्था” या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधनपर कार्यक्रम, तसेच युवकांसाठी वाचनालयाची स्थापना असे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्रावर चालत विश्वास राणे यांनी समाजजागृती आणि संघटन बांधणीचे कार्य हाती घेतले आहे.

याशिवाय, मा. बाळू राणे आणि मा. चांगदेव राणे — हे जनार्दन राणे यांचे काका — हे दोघेही समाजकार्यात सक्रिय असून, त्यांच्या मार्गदर्शनाने राणे कुटुंबातील सामाजिक कार्य अधिक प्रभावी झाले आहे.
या कुटुंबाचा सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेचा पाया अत्यंत मजबूत असून, रणे घराण्याचं योगदान नळदुर्गच्या नागरिकांना चांगलं परिचित आहे.

विरोधकांवर थेट प्रहार

विश्वास राणे यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला —

“१९५४ पासून रणेंनी सत्ता नव्हे, तर जनतेचं विश्वासाचं राज्य टिकवलं आहे.
आम्ही कामगिरी दाखवली, त्यांनी फक्त वचनं दिली!
नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आमदार राणाजगजितसिंग पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात एकदिलाने काम करतो.
आता खोट्या प्रचाराला जनता उत्तर देणार आहे.”

मतदारांना थेट संदेश

“नळदुर्गचा विकास, सर्व समाजाचा सन्मान, आणि गोरगरिबांचा आवाज —
हेच रणेंचं ध्येय आहे.
या निवडणुकीत पुन्हा एकदा जनता रणेंच्या मागे ठाम उभी राहील!”

१९५४ मध्ये पहिली निवडणूक जिंकून विश्वनाथ राणे यांनी जो विश्वासाचा धागा जोडला, तो आजही कायम आहे. आता अनिता जनार्दन राणे यांच्या रूपाने तोच वारसा नव्या जोमाने पुढे जात आहे. आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रणे कुटुंबाचा भाजपमधील प्रभाव अधिक वाढला असून, प्रभाग क्रमांक १० मध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी – आयुब शेख, नळदुर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *