PARBHANI | शेतकऱ्यांनी मदत मागितली, कर्जमाफी मागितली की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची. कुठेतरी शेतकऱ्यांनी आपले हातपाय देखील हलवले पाहिजेत. याचा समाचार घेतांना उद्धव ठाकरे यांनी थेट अजित पवारांना प्रश्न विचारला की तुम्ही आणि तुमच्या मुलाने असं काय कोट्यावधी रुपयाची पुण्यामध्ये जमीन लाटण्याचं काम तुम्ही केलं आहे. एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी मदत मागतोय पण त्याला मदत दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र पंतप्रधान मोदी हे बिहार मध्ये निवडणुका असल्यामुळे न मागता महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार रुपये टाकत आहेत. मराठवाड्यातला शेतकरी मेटाकोटीला आले असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडे फिरकलेच नाहीत. प्रचार करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. या सरकारला जागा दाखवली पाहिजे, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपला मतदान करू नका नोटबंदी करा असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
