शासन आपल्या दारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम आयोजन!
मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी पूर्ण!!!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस तथा परभणीचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांचा दौरा परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रीष्म वस्तीगृहा समोरील मैदानात तारीख २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता निश्चित झाला असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,पोलीस अधीक्षक रागसुधा आर,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन,आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नुकतेच विद्यापिठातील मैदानावरील सभामंडपाची पाहणी केली.आणि कार्यक्रमाचे चोख नियोजन करीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी,सर्वसामांन्याच्या दारी या अभियानांतर्गत यावेळी परभणी जिल्हा शासकीय योजनांचा लाभ वाटप मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,खासदार, आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमास खासदार संजय जाधव,फौजीया खान,आमदार सुरेश वरपुडकर,डॉ राहूल पाटील,रत्नाकर गुट्टे,मेघनाताई बोर्डिकर,सतिश चव्हाण,विक्रम काळे,बाबाजानी दुराणी,विप्लव बजोरीया,विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभाची तयारी केली आहे.सदर कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे..
प्रतिनिधी, परभणी..