सोनपेठ : गंगाखेड तालुक्यातील एका शिक्षकास शाळेकडे येत असताना रस्त्यात अडून शिवीगाळ आणि मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक राठोड यांनी मयत शिक्षकास फोन करून धारासुर येथील बोलून घेतले मात्र मयत शिक्षकाने मी गंगाखेड येथे असल्यामुळे मी येऊ शकत नसल्याचे सांगितले
आस्था मयत शिक्षक धारासुर येथील प्रशाळेच्या दिशेने येत असताना त्यांना वाटेत आढळून स्वीगाळ करत आरोपी शिक्षक राठोड यांनी केली व अपमानित केले याचा राग मनात धरून धारासुर येथील शाळेच्या कार्यालयाच्या छताला गळफास घेऊन विठ्ठल अनंतराव रत्नपारखे या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सोनपेठ पोलीस निरक्षक संदीप बोरकर हे करत आहेत