औरंगाबाद : सोयगाव तालुक्यामधे सोयगाव तहसील महसुल विभागाच्या आणि सोयगाव तालुका कृषी विभाग कार्यालयाचे कर्मचारी अधीकारी यांच्या गलथान कारभारामुळे सोयगाव तालुक्यातील अनेक गावांचे शेतकरी पीक नुकसान भरपाई अनुदान योजने पासुन वंचीत राहीले असुन या शेतक-यांना पीक नुकसान भरपाई अनुदान कधी मिळनार हा प्रश्न निर्माण झाला आहे

अतीवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शेतक-यांना काही प्रमाणामधे मदत म्हनुण झालेल्या पीकांची नुकसान भरपाई अनुदान पाठविले आहे परंतु हे अनुदान काही शेतक-यांना मिळाले तर अनेक शेतकरी या शासनाने पाठविलेली अनुदानाच्या स्वरुपामधे रक्कम शेतक-यांना मिळाली नाही यामुळे सोयगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासुन वंचीत आहे सोयगाव तालुक्यामधे अतीवृष्टी चा मोठ्या प्रमानामधे पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे खुप मोठे नुकसान झालेले असुन या अतीवृष्टी पावसामुळे पुर्ण पीकांचे नास धुस झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खुप मोठ्या संकटामधे सापडलेला आहे शासनाने नुकसान भरपाई मदत म्हनुण पीक नुकसान भरपाई अनुदान शेतक-यांना पाठविलेले असुन सुद्धा काही शेतक-यांना मिळले आणि बरेच शेतकरी या अनुदानाची वाट पाहुन आहे जर सोयगाव महसुल आणी सोयगाव तालुका कृषी विभाग यांनी काळजीपूर्वक काम केले असते तर आज अनेक शेतकरी या पीक नुकसान भरपाई अनुदानापासुन वंचीत राहीले नसते अनेक दिवसांपासुन शेतकरी अनुदानापासुन वंचीत राहीलेले आहे शेतकरी यांना असा प्रश्न पडलेला आहे पीक नुकसान भरपाई मिळनार की वंचीत राहावे लागेल महसुल आणी कृषी विभाग यांच्या हलगर्जी पनामुळे बरेच शेतकरी वंचीत आहे जर सोयगाव महसुल विभाग आणी कृषी विभाग कार्यालयाच्या कर्मचारी अधीकारी यांनी वेळेवरती योग्य दखल खबरदारी घेतली असती तर हा प्रकार झाला नसता आणी शेतकरी अनुदानापासुन वंचीत राहिले नसते हा खुप मोठा गंभीर प्रकार आहे या मनमाणी आणि हलगर्जी पणा गलथान कारभारामुळे आज रोजी अनेक शेतकरी वर्ग अनुदानापासुन वंचीत आहे वंचीत राहिलेले शेतकरी आजही अनुदानाच्या प्रतिक्षा मधे अतुरतेने वाट बघत आहे नेमके हे अनुदान कधी मिळनार हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी
सोयगाव औरंगाबाद