
हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांची काही महिन्यांपूर्वी सेनगाव येथुन गोरेगांव पोलीस ठाण्याला बदली झाली असुन त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस स्टेशन गु.र.नं.११३/२०१८ कलम ३५३,२९४,५०४,३४भा.द.वी.प्रमाणे दाखल झाल्या नंतर त्यांनी योग्य कर्तव्य बजावत तपास कौशल्य वापरून जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे खटला क्रमांक ५७/१९प्रमाणे दोषारोप दाखल केले सदर खटल्यांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयानी दि.३०/११/२०२१ रोजी गुन्ह्यातील सर्व आरोपीतांना तिन महिने कारावास व ३००० रुपये दंडाची शिक्षा केली.पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी योग्य कर्तव्य बजावत केलेली कामगिरी पोलीसांची प्रतिमा उचावणारी असल्याने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांचे पोलीस विभागाकडून स्वागत केले जात आहे.