अहिल्यानगर प्रतिनिधी (दि. 0२ डिसेंबर)

अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि पक्षी, प्राणी तसेच मानवी जीवितास गंभीर इजा करणारा प्लास्टिक नायलॉनचा ‘चायना मांजा’ घेऊन जात असलेल्या एका आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेने १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना मिळाली माहिती

पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

  • श्री. किरणकुमार कबाडी यांनी पो.अंमलदार सुनिल पवार, संतोष खैरे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बिरप्पा करमल आणि मपोअ सोनाली भागवत यांचे विशेष पथक तयार केले.
  • अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग करत असताना, पथकाला जी.एल.पी. टॉवर, लिंक रोड, केडगाव या ठिकाणी एका ॲक्टिव्हा (विना नंबर) मोटारसायकलवर दोन बॉक्स बांधून एक इसम जात असल्याचे दिसले.

११० नग मांजा आणि मोटारसायकल जप्त

सदर पथकाने या इसमाला थांबवून त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव विशाल कुमार दळवी (वय- ३० वर्षे, रा. केडगाव, अहिल्यानगर) असे सांगितले. त्याने बॉक्समध्ये नायलॉन मांजा असून तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त केला:

  • ११० नग मोनो काईट, मोनो फायटर व गोल्ड असे नाव असलेला प्लास्टिक नायलॉन मांजा (किंमत ₹१,१०,०००/-).
  • चोरीसाठी वापरलेली होंडा कंपनीची ॲक्टिव्हा मोटारसायकल (किंमत ₹७५,०००/-).
  • एकूण जप्त मुद्देमाल: ₹ १,८५,०००/-

याप्रकरणी पो.हे.कॉ. सुनिल विनायक पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.


अहिल्यानगर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *