तालुक्यातील साकत बावी, फक्राबाद व सावरगाव सह सर्व परिसरात भीतीचे वातावरण; वन विभागाकडून बिबट्या fcच्या हालचालींवर नियंत्रण
जामखेड तालुक्यातील बावी गावच्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे उषाबाई सौदागर चव्हाण (45) या महिलेवर गंभीर इजा झालीआहे. त्यांना स्थानिक जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आल्यावर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेण्यात आले आहे.
बावी व फक्राबाद या भागातील सावता राऊत यांच्या 3 बोकडांचा विवट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून असल्याने वन विभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
सावरगाव येथील पोलीस पाटील तुषार चव्हाण यांच्या वस्तीवरील शेळी लांडग्याने अथवा बिबट्याने काल रात्री नऊच्या सुमारास जागेवर फाडून घेऊन गेला आहे राहत्या घरापासून केवळ 50
ते 60 फुटावर बांधलेल्या शेळीचा कसल्याही प्रकारचा आवाज आला नाही. हनुमान वस्ती येथील आठ दिवसापासून सिंगल फेज लाईट नसल्याकारणाने अंधाराचा फायदा घेऊन लांडगा अथवा बिबट्याने
शेळीची फराळ केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणा आहे. वन विभाग आणि स्थानिक प्रशासना हे लक्षात घेऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तयारी करत आहेत. नागरिकांनी रात्री एकट्याने फिरण्याचे टाळा आणि सतर्क राहण्याचा इशारा हि दिला आहे.
या परिसरात बिबट्याचा वावर आणि त्याचा हल्ला चिंतेचा विषया ठरत आहे. ही घटना स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीती वाढवणारी ठरली असून वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
