जामखेड,
नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन तसेच श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन (दिल्ली प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय मानव सेवा पुरस्कार २०२५ जामखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनलाल लोढा यांनी कोठारी यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले आहे. जैन सांस्कृतिक महोत्सव नाशिक तसेच जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनचे महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा व कांतीलाल चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. पुरस्कार निवड समितीने संजय कोठारी यांच्या मानवसेवेतील भरीव योगदानाची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. या कार्यक्रमात अन्य सात पुरस्कार विविध मान्यवरांना दिले जाणार आहेत. कोठारी यांच्याकडून मुक्या प्राण्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, रस्त्यावर सापडलेल्या जखमी पशु पक्षी मोर, हरीण, सायाळ, काळवीट आशा जखमी प्राण्यांचे वन अधिकाऱ्यांच्या समवेत अंत्यसंस्कार केले, बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार, बेवारस व्यक्तींना रुग्णालयात उपचार व स्नेहालय संस्थेमार्फत पुनर्वसन, एड्सग्रस्त रुग्णांना मदत, तसेच नवजात बालिका व अर्भकांचे प्राण वाचवून त्यांना इटली, मुंबई आदी ठिकाणी दत्तक देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. या सर्व मानवतावादी कार्याची दखल घेत ३१ डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
