भाजपाचे १५ नगरसेवक विजयी; जामखेडवर भाजपाचे वर्चस्व कायम
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, अटीतटीच्या या लढतीत भारतीय जनता पार्टीन आपला गड कायम राखत स्पष्ट विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी ९.७५४ मते मिळवत ३,६८२ मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात
यांना ६,०७२ मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत भाजपाने एकूण १५ नगरसेवक निवडून आणत नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ५ जागांवर, वंचित बहुजन आघाडीने २ जागांवर विजय मिळवत खाते उघडले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला १, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १ जागा मिळाली आहे. निकालानंतर शहराच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे खाते उघडले
वंचित बहुजन आघाडीने प्रभाग सहामधून डॉ. ॲड. अरूण जाधव व संगिता भालेराव यांनी विजयी होत नगरपरिषदेत प्रथमच प्रवेश केला.
नव निर्वाचीतनगराध्यक्षां पुढे हि असतील प्रमुख आव्हाने
उजनी पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम, शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन, समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक रस्ता, बस स्थानकात प्रवाशांसाठी फिल्टर पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, धूळ चिखल घनकचरा मुक्त शहर, महिलांची सुरक्षितता व वाढती गुन्हेगारी-या प्रश्नांवर नव्या नगराध्यक्षांना तातडीने उपाययोजना कराव्या लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
