जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील मोडतोड केली आहे. मागिल भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला आसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमीस तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या जामखेड पोलीसांकडून सुरू आहे.या बाबत पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री हॉटेल मालक रोहीत अनिल पवार हा हॉटेलवर गिऱ्हाईक पहात होता. यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला केला हॉटेलची तोडफोड केली. तसेच जखमी रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे, कान्होपात्रा नगर, जामखेड, याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीची तोडफोड केली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपी हल्ला करुन पळुन गेल्या नंतर घटनास्थळाहुन जखमीस तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांकडून आजुबाजुचे काही सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आहेत.
यामध्ये दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत
मागिल भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अहिल्यानगर येथुन फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे आवषेश सापडले आहेत. याप्रकरणी दोन संशयितां सह इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांन कडुन सुरु आहे. सध्या जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली आहे.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
