छत्रपती संभाजी नगर
जिल्हास्थरीय निवडी झाल्याने स्कूल मध्ये शिक्षक – शिक्षिका विद्यार्थांच्या उपस्थितीत विद्यार्थींनीचे जंगी स्वागत
: राज्य विज्ञान संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर अंतर्गत गुरुवारी ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साह पूर्ण पार पडले यात विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण सादरीकरणांनी सर्वांची मने जिंकून घेतली होती. प्रतिक्षा विजय पगारे १० वी कै. बाबुराव काळे माध्यमिक विद्यालय सोयगाव माथमिक गटातून उत्कृष्ट विज्ञानिक प्रदर्शन, व प्रोजेक्टचे सादरीकरण केले. गटसाधन केंद्राचे विशेष तज्ञ आणि पर्यवेक्षकांनी केलेले गुणांकाचे एकत्रीकरण केले असता १७१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर मजल मारणारे असल्याने या विद्यार्थिनींचा शुक्रवार (दि.५) कै. बाबुरावजी काळे माध्यमिक विद्यालयात मु .अ. निलेश पाटील,शिक्षक योगेश काळे, सागर घाटे ,ज्ञानेश्वर एलिस, शिक्षिका अंजली कथलकर, रूपाली मानकर आदी, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थांच्या उपस्थितीत विद्यार्थींनीचे पुष्पगुच्छ देत औक्षण करिता जंगी स्वागत करण्यात आले.
शाश्वत शेती,कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित उर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडलींग, आरोग्य आणि स्वच्छता, जल संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर सोयगाव तालुक्यातील प्राथमिक सहाव्वी ते आठवी, माध्यमिक गटातुन नहव्वी ते बाराव्वी पर्यंत शालेय बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता, विज्ञानाची दिशा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता यांची प्रभावी मेजवानी या प्रदर्शनातून पाहायला मिळाली.गटसाधन केंद्राचे विशेष तज्ञ शिक्षक सुनील बावचे, कैलास लांडगे, जगन्नाथ काकडे व श्रीमती प्रतिज्ञा सोनवणे, डॉ. एस. एल. पाटील, आर. टी.जाधव, टी. आर. शेख यांनी प्रमाणिक व काटेकोर मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केले.
तालुका स्तरावर प्रथम प्रतिक्षा पगारे कै.बाबुराव काळे माध्यमिक विद्यालय सोयगाव, दूतीय भाग्यश्री लक्ष्मण निकम एस. बी. हायस्कूल गोंदेगाव, तृतीय ज्योत्सना वाल्मिक पाटील जि.प. प्रशाला सोयगाव,तर माध्यमिक गटातून प्रथम प्राची सोनवणे, शुभ्रा सोहनी, जयश्री कोळी या विद्यार्थीनी तयार केलेला शाश्वत शेती उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.दुतिय नंदिता सतिष बावस्कर जि.प. शाळा सावरखेडा ब ! , तृतीय वेदिता समाधान बावस्कर आणि ईतर कै. बाबुराव काळे माध्यमिक विद्यालय सोयगाव यांची निवड झाली या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालीली आहे यश मिळाल्या बद्दल विद्यार्थी,शिक्षकाचे गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, केंद्र प्रमुख फिरोज तडवी,पालक,गावकरी यांनी अभिनंदन केले.

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजी नगर
