जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी जामखेड येथील ईव्हीएम स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी करून निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. जामखेड शहरातील श्री नागेश्वर सामाजिक सभागृह येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत कर्मचारी प्रशिक्षण, ईव्हीएम यंत्रांचे वाटप व – स्वीकृती याबाबतच्या नियोजनाची
माहिती घेतली. तसेच मागील निवडणुकीतील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमचीही त्यांनी पाहणी केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर करण्यात
आलेली तयारी, सुरक्षा व्यवस्था व आवश्यक उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले
सर्व यंत्रणांनी आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पणे पालन करावे, असे डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले. यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय साळवे, तहसीलदार धनंजय बांगर, नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरपरिषद निवडणूक विभागाचे मंगेश घोडेकर, स्थापत्य अभियंता आमेर शेख व महेश शेकडे आदी उपस्थित होते.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
