महात्मा फुले ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार अमोल पाटील यांना प्रदान
सचिन बिद्री :धाराशिव
उमरगा तालुक्यातील स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येणारा महात्मा फुले ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार यंदा उमरगा तालुक्यातील पत्रकार अमोल पाटील यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार दि. २८ रोजी उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्याख्याते ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रविण स्वामी तसेच प्रमुख पाहुणे नूतन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे व्याख्यान तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी संयोजक सुभाष वैरागकर, कॉ. अरुण रेणके, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, सौ. सोनाली पाटील, प्रतिष्ठानचे संजय वैरागकर, सूर्यकांत वैरागकर, रघुवीर अरणे, दयानंद पाटील, गिरीजाकांत वैरागकर, श्रीशैल्य बिराजदार यांच्यासह विविध पुरस्कारार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
