अकोल्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर येत असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची विशाल जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
अकोल्यातील गोरक्षण रोड स्थित रेणुका मैदानावर ही भव्य सभा पार पडणार आहे. या सभेच्या माध्यमातून महायुती निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून, विरोधकांना तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. या भव्य सभेच्या यशस्वी नियोजनासाठी तब्बल ३०० सक्रिय कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
