राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता चेमटे यांनी 5 मार्च 2026 पर्यंत महामार्गाची हद्द निश्चित करण्याचे लेखी दिले होते परंतु हद्द निश्चितीची कोणतीही प्रक्रिया न झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता चेमटे यांनी व संबंधित वरिष्ठ अधिकारी हद्द निश्चित करत नाही तोपर्यंत शुक्रवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी पासून सर्वपक्षीय व सर्वसामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकारला आहे तरी सर्व व्यापारी ग्रामस्थ पत्रकार बांधवांनी शहर विकासासाठी सहकार्य करावे असे आव्हान आंदोलकांकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर सुजित चेमटे यांनी दिनांक ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दिनांक २६ फेब्रुवारी रोजी चा जामखेड बंद मागे घेतल्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया न केल्याने मागे घेतलेले जामखेड बंदचे आंदोलन पुन्हा पुकारले असून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबंधित वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द निश्चित करत नाही तोपर्यंत उद्या दिनांक ६ मार्चपासून सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने जामखेड बेमुदत बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच तोडगा न निघाल्यास शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जामखेड जिल्हा अहिल्यानगर वरील शहरातील रस्त्याच्या कामाला कायमस्वरूपी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी दिनांक २६ मार्च २०२६ पासून अतिक्रमण बाबत अतिक्रमण कार्यवाही होईपर्यंत सर्वपक्षीय जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार होता मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता सुजित चेमटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर जामखेड बंद मागे घेण्यात आला होता गेले साडेतीन वर्षापासून

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे ते अनेक अडथळे व कासवगतीने सुरू आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात ही झाले आहेत यामध्ये अनेक जण गायबंदी तर काहींना आपली जीव गमावे लागले आहेत. हे काम सुरू असताना अनेक अडचणी बरोबरच अतिक्रमण काढणे हा मोठा अडथळा ठरत आहे यासाठी विविध संघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका तसेच जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमण काढण्याचे सूचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी सर्वपक्षीय व बेमुदत जामखेड बंदचे हत्यार उपसले होते. त्याच अनुषंगाने जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी महामार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी काही दिवसांपूर्वी पुकारलेला बेमुदत बंद स्थगित करण्यात आला होता मात्र सर्वपक्षीय साखळी उपोषण सुरू ठेवण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक ५ मार्च रोजी निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्याने उद्या शुक्रवार दिनांक ६ मार्चपासून सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ व ५४८ डी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणामुळे जामखेड शहर बेमुदत बंद पुकारला आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *