बुलढाणा : जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे महापरिनिर्वाण दिना निमीत्त महार रेजिमेंट व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. ६ डिसेंबर २०२१रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांद्राकोळी येथे आजी माजी सैनिक व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच संजय काळवाघे, प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र माधवरावजी हुडेकर, आणि प्राध्यापक सिद्धार्थ हिवाळे, उपसरपंच मनोज जाधव,सिद्धार्थ हिवाळे,पोलीस पाटील संदीप हुडेकर,रमेश उबाळे ,रवि हिवाळे, मोहन जाधव, विनोद जाधव ग्रा.प. सदस्य उपस्थित होते
नेहमीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्प हार अर्पण करण्यात आले तसेच तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प हार अर्पण करुन प्रतीमेचे पुजन करण्यात आले मान्यवरांचे भाषणेही झाली पण खऱ्या अर्थाने गावाच्या इतिहासामध्ये एक छोटेसे ग्रामीण भागामध्ये महार रेजिमेंट आजी माजी सैनिक व संघर्ष ग्रुप यांनी रक्तदान करून समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला कोरोना च्या महाभयंकर काळात युवक रक्तदान करण्यास तयार होत नाही भारतावर कुठलीही आपत्ती आल्यास अंतिम शेवटी जवानच ही आपत्ती दूर करतो त्याचप्रमाणे नांद्राकोळी या छोट्याशा गावात सुद्धा जवानांनी रक्तदान करून दाखवून दिले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैनिक अमोल हिवाळे, प्रदीप हिवाळे ,आदिनाथ हिवाळे, तसेच संघर्ष ग्रुप चे अध्यक्ष आकाश हिवाळे, अविनाश जाधव ,मनोज हिवाळे, संजय नरवाडे, नितीन हिवाळे, शर्मिल शहा, प्रणव मोरे, आकाश जाधव, प्रकाश जाधव, शाहरुख शहा, कुणाल हिवाळे ,नितीन जाधव ,अश्पाक शहा, सुरज हिवाळे, कलीम शहा, रामेश्वर गवहिवाळे ,योगेश जाधव, जितेंद्र हिवाळे, नयुम शहा, सुलतान शहा, गजानन मंजुळे ,शंकर गवई, यांच्यासह इतर अनेक गावातील युवकांनी सहकार्य करत रक्तदान केले
प्रतिनिधी जब्बार तडवी बुलढाणा