section and everything up until
* * @package Newsup */?> बुलढाणा : मलकपुरातील "ती" रेड पूर्णपणे मॅनेज ! अप्पर पो.अ. यांच्या पथकातील कर्मचारीच निघाला खबऱ्या, कारवाई दाखविण्यासाठी चोर सोडून संन्याशाला फाशी | Ntv News Marathi

बुलढाणा : अवैध व्यवसायिक आणि त्यांना मदत करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कर्दनकाळ मानल्या जाणाऱ्या खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे रुजू होण्यापूर्वी जिल्हाभरात विशेषता घाटाखाली अवैध व्यावसायिकांसह अवैध व्यवसायांचे पोषण करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी भीती पाहावयास मिळाली होती. त्यासाठी घाटाखालील भागात अवैध व्यवसाय काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद करून बस्तान गुंडाळण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात दिले होते. मात्र महिन्याभरातच नावाशिवाय कारवाई काहीच नाही हे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजताच ज्याप्रमाणे घाटावर व्यवसाय सुरू आहेत त्याच प्रमाणे घाटाखालील पोलिस स्टेशन अंतर्गतहि अवैद्य व्यवसायिकांनी आपली डोके वर काढले. यामध्ये विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहर व तालुक्यामध्ये सर्वच अवैध व्यवसाय खुलेआमपणे सुरू झालेले आहेत.

दरम्यान याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात कळल्याने त्यासाठी यांच्या विशेष पथकाने मलकापूर शहरात भेट देऊन फक्त दोन ठिकाणी धाडी टाकून भेदभाव केल्याची चर्चा आहे, घर का भेदी लंका ढाय या ओळींना अनुसरून पथकातीलच एका कर्मचाऱ्याने शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या बड्या माशांना अलर्ट करून दिले अलर्ट मिळताच व्यवसायिकांनी आपला मांजा गुंडाळला मात्र खामगाव वरून मलकापूर ला गेलो तर कारवाई तर करावीच लागेल म्हणून वरली मटका जुगार लिहिणारे काही पोटाची खळगी भरणारे गरीब मजूर धारकांना वेठीस ठरून कारवाई करण्याच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले आणि गुन्हे दाखल करण्यात आले या सर्व कारवाईमध्ये पथकातील खबर्‍याने अवैध व्यवसायिकांना अलर्ट केल्याने ही रेड फेल झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात दिवसभर रंगली होती. अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सुरुवातीलाच पोलिसांना अवैध व्यवसायीकां सोबत कुठलेही संबंध ठेवू नये असे आदेश दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवित त्या कर्मचाऱ्याने एका दुसऱ्याच्या अलर्ट वरून शहरात माहिती दिल्याची चर्चा आहे.


मलकापूर शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक प्रमुख मार्गावर शंभर शंभर मीटरच्या अंतरावर जुगार वरली लिहिण्याचे दुकाने खुलेआम सुरू असताना पथकला मोजकीच दोन दुकाने दिसून एवढी कमी रक्कम मिळणे खरोखरच हास्यास्पद आहे याकडे अप्पर पोलीस अधीक्षक दत्त यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पथकातील खबऱ्या हा यापूर्वी बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेत असल्याने मलकापुरातील अवैध व्यवसाय काकांसोबत त्याचे जवळचे हितसंबंध आहेत काही दिवसापूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त अवैध वरली मटक्याच्या व्यवसाय करणाऱ्या प्रकाशा सारखा तेजमय दिसणाऱ्या एका वाक्तीने चौकाचौकात होर्डिंग सुद्धा लावले होते हे विशेष.

दत्त साहेब कारवाई कधी होईल ?

श्रवण दत्त एस साहेब रुजू होण्यापूर्वी त्यांच्या नावाची चर्चा खूपच होती त्यामुळे घाटाखालील सर्वसामान्य नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला होता आता अवैध व्यवसाय बंद होतील आणि पोलिसांकडून सर्वसामान्यांना न्याय मिळेल असे वाटत होते मात्र दत्त यांना दोन महिन्याच्या वर कालावधी उलटला तरी त्यांच्या नावाप्रमाणे कुठलीही विशेष कामगिरी अद्याप पर्यंत तरी समोर आली नाही. सुरुवातीचे पंधरा दिवस आणि त्यानंतर महिना उलटल्यावर आधी जैसे सर्वच धंदे सुरू झाल्याने रेट वाढवण्यासाठी खडक असल्याची अफवा तर पसरवल्या गेली नाही ना अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *