बुलडाणा : इंडोनेशियाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवीन कीर्तिमान रचनारे रामा मेहसरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मलकापूर येथील खेळाडूंचा क्रीडा राज्यमंत्री मा. सुनील केदार यांच्या हस्ते सत्कार केला गेला. आज क्रीडा मंत्री यांचा बुलढाणा जिल्हा दौरा होता. दौऱ्या दरम्यान आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र शिगणे यांच्या कडील कार्यक्रमाला हजेरी लावत ; बुलडाणा येथील क्रीडा संकुलाचेही उदघाटन क्रीडामंत्र्यांनी केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष रायपुरे यांचकडे भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला व दौऱ्यानंतर परतीच्या प्रवासात मलकापूर रेल्वे स्टेशनला खेळाडूंचा सत्कार करत उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या खेळाडूंना खेळाडू आरक्षणातून सेवेसाठी समाविष्ट करण्यासाठी आश्वासन सुद्धा दिले.प्रसंगी संतोष रायपुरे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष,श्यामकुमार राठी, नगराध्यक्ष हरीश रावळ, राजू पाटील नगरसेवक, अरुण अग्रवाल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचेसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.