मलकापूर:- सरकार दररोजच पेट्रोल व डिझेलमध्ये जुल्मी वाढ करत असून यामुळे महागाईचाही भडका उडाला आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिन आणण्याची भुलावना करून केंद्रात सरकार आल्यानंतर मात्र नागरिकांना अक्षरश: महागाईच्या भस्मासुरात केंद्र सरकार लोटत असून याचा निषेध म्हणून आज शिवसेना प्रणित युवासेनेच्या वतीने शहरातून सायकल रॅली काढून दरवाढीचा व केंद्र सरकारचा निषेध शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, तालुका प्रमुख विजय साठे, युवा सेना तालुका प्रमुख विजय काळे, शहर प्रमुख गोलु कुदळे, शहर उपप्रमुख उमेश हिरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
पेट्रोलचे दर ११५ रूपये तर डिझेलचे दर १०५ रूपयांच्या वर पोहचले आहेत. दररोज सकाळी उठल्यावर आज किती वाढ झाली एवढेच नागरिकांना बघावे लागत आहे. यापुर्वीच्या सरकारमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर ६०-७० रूपये असतांना भाजपाच्या वतीने आंदोलने करून देश हादरून सोडला होता. आम्ही पेट्रोल, डिझेल स्वस्त करू व अच्छे दिन आणू अशा बतावणा त्यांनी त्यावेळी केल्या होत्या. आता मात्र सत्तेत असतांनाही पेट्रोल, डिझेल दरवाढी बाबत ब्र शब्दही काढण्यास तयार नसून नागरिकांना जणू वाऱ्यावरच सोडले आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम इतर जिवनावश्यक वस्तुंवर झाला असून यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडण्या बरोबरच त्यांच्या जिवनावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा ही झालेली दरवाढ तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने भाजपा सरकारचा धिक्कार करीत सायकल रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, तालुका प्रमुख विजय साठे, युवा सेना तालुका प्रमुख विजय काळे, शहर प्रमुख गोलु कुदळे, राजेशसिंह राजपूत, विनायक जवरे, शहर संघटक राजू फुलोरकर, शहर उपप्रमुख उमेश हिरूळकर, उप तालुका प्रमुख युवासेना अमित राजपूत, अनंता गायगोळ, भरतसिंह राजपूत, आनंद जगदाळे, उमेश राऊत, मुकेश लालवाणी, गजानन धाडे, स्वप्नील भगत, संतोष घोडके, प्रदीप हिरळकर, श्याम चोपडे, गोलु वानखेडे, सोनु चोपडे, सागर पवार, योगेश पोपे, आकाश जंगले, अनिकेत साठे, गणेश सुशीर, तानाजी चोपडे, संतोष देशमुख, रामेश्वर मेहसरे, अमोल कळमकर यासह आदी सहभागी झाले होते.
Skip to content