बुलडाणा : मलकापूर नगर परिषद हद्दीतील मोठे झाड कोणतीही परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या तोडल्या प्रकरणी महेश दामोधर काळे रा . शिवाजीनगर मलकापूर याचे विरूध्द न.प. आरोग्य निरीक्षक यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये मलकापूर शहर पो.स्टे . ला गुन्हे दाखल करण्यात आले आहे . याबाबतची माहिती अशी की , महेश काळे हे न.प. हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर असलेल्या पाटबंधारे कॉलनीजवळील मोठे झाड बेकायदेशीररित्या तोडत असल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड . हरीश रावळ यांना दिल्यानंतर आरोग्य निरीक्षक योगेश घुगे यांनी त्याठिकाणी जावून आरोपी महेश काळे यास मनाई केली असता त्याने अरेरावीची उत्तरे दिली . त्यानंतरही झाड तोडणे सुरूच ठेवून अंदाजे ५४०० रूपयांचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले . याप्रकरणी आरोग्य निरीक्षक घुगे यांच्या तक्रारीवरून काळे यांचे विरूध्द गुन्हा क्र .०५८१ / २०२१ अन्वये महाराष्ट्र नागरी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १ ९ ७५ , महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १ ९९ ५ अन्वये गुन्हे दाखल केले आहे . झाडे लावा

.. झाडे जगवा .. असे आवाहन शासन करीत असतांना शहरातील हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या वृत्ततोड़ करून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर अंकुश बसावा याकरीता मलकापूर परिसरातील नागरिकांनी अशी बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्यास मला प्रत्यक्ष संपर्क करावा . असे वृक्षतोडीचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा नक्कीच बडगा उगारण्यासाठी तक्रार करून त्यांना अद्दल घडविल्या जाईल . अॅड . हरीश रावळ नगराध्यक्ष , मलकापूर –

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *