बुलडाणा : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शहरातील रस्ते खोदून एका वंâपनीने केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम बेकायदेशीर असतांना नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे डोळेझाक केली असून वंâपनीने केलेल्या या बेकायदेशीर रस्ता खोदल्या प्रकरणी त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह आदींनी १ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी न.प. मलकापूर यांचेकडे केली होती. मात्र न.प. प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने आज ४ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकाNयांच्या दालनात प्रहारच्या पदाधिकाNयांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच मुख्याधिकारी यांनी संबंधित वंâपनीने केलेल्या बेकायदेशीर कामामुळे जर न.प.च्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याने त्या बाबतची चौकशी करून त्यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे पत्र दिल्याने सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

मलकापूर नगर परिषद हद्दीमध्ये येत असलेल्या बोदवड रोडसह इतर भागामध्ये एका नामांकीत वंâपनीकडून रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे करीत असतांना संबंधित वंâपनीकडून कुठल्याही विभागाची वा नगर परिषदेची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे न.प.अधिकाNयांनी सांगितले. तरी सुध्दा शिरजोरपणे संबंधित वंâपनीच्या कर्मचाNयांकडून रस्त्यांचे विदु्रपीकरण करण्यात येवून केबल टाकण्याचे काम केले जात असतांना सुध्दा त्यांचेवर न.प. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई न करता एकप्रकारे त्यांच्या या अनधिकृत कामाला अभयच देण्याचे काम सुरू आहे.  तेव्हा अशाप्रकारे स्वफायद्यासाठी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम करणाNया ‘त्या’ वंâपनी विरोधात न.प. प्रशासनाकडून विनाविलंब ठोस अशी कारवाई करण्यात यावी व रस्त्यांच्या केलेल्या विद्रुपीकरणा करीता त्यांचे विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार देवून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागण्ी करण्यात आली होती. त्यावर न.प. प्रशासनाने कारवाई न केल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न.प. कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, बळराम बावस्कार, राहुल तायडे, अमोल पाटील, निखील भोसले, उमेश जाधव, अजित पुंâदे, संतोष जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *