पालघर : गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय,पालघर आणि पालघर तालुका विधीसेवा समिती च्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या कायदेविषयक हक्क व जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.विधी शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी यांमध्ये सहभाग घेतला होता.

सदर पथनाट्य केळवे येथील देवीपाडा आणि धवांगेपाडा येथे सादर करण्यात आले.
महिला विषयक अत्याचार वाढ होत आहे याबाबत महिलांना कायदेविषयक अधिकार व हक्क माहिती व्हावे तसेच जनजागृती व्हावी यासाठी सदर पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.
केळवे येथील शितलादेवी देवीपाडा आणि धवांगेपाडा येथे ही पथनाट्ये सादरीकरण करण्यात आले.
यावेळी कौटुंबिक महिला हिंसाचार, कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचे होणारे लैगिंक शोषण व मानसिक शोषण,शालेय मुलींचे होणारे लैगिंक- मानसिक शोषण व तसेच हुंडाबळी या विविध विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.तसेच गाण्याच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक अड. विनोद गुप्ता,अड. उत्कर्षा जुन्नरकर,अड.दिशा तिवारी,अड.प्रियांका तांडेल तसेच केळवे ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष भुरकुड, केळवे पोलीस पाटील श्री. मनोज पाटील व अंगणवाडी सेविका, आशा तसेच जि. प.शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *