आ.चव्हाण यांच्या निधीतील १५ लक्ष रुपयाच्या रुग्णवाहिकेचे उमरगा उपजिल्हा रुग्णालयास लोकार्पण

उमरगा : उस्मानाबाद

उस्मानाबाद : पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयास १५ लक्ष रु. किमतीची रुग्णवाहिका देण्यात आली .दि ३ रोजी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ . सतीश चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.विक्रम आंळगेकर यांच्याकडे रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली .
राज्यात कोविड विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक आहे. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी आमदार निधीतून उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली असल्याचे आ.चव्हाण यांनी यावेळी सांगीतले.
उमरगा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची मदत होणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, डॉ .विक्रम आळंगेकर,डॉ . एस आर जाधव,तालुकाध्यक्ष संजय पवार, प्रा . सतीश इंगळे, शहराध्यक्ष सुशील दळगडे , ग्रंथालय विभाग प्रदेश सदस्य जगदीश सरवसे, युवक विधानसभा कार्याध्यक्ष बाबा पवार, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनीता पावशेरे ,सरपंच विष्णू भगत, बाळू माशाळ, प्रदीप बालकुंदे, विजय सगर,डॉ जगन्नाथ कुलकर्णी डॉ .आर एन सोनवणे ,गीरीष कडगंचे, अधिपरिचारिका राखी वाले, वर्षा निकम , श्रीमती रंगदळ ,एस सी कुंभारफय्याज पठाण ,अभिषेक वडदरे, मारुती कुन्हाळे, संजय जाधव, शरद पाटील ,राजू तूरोरीकर, किशोर जाधव, नेताजी कवठे , बाळू फरताळे, वाघंबर सरवदे, योगेश जाधव, विष्णू गायकवाड आदींची उपस्थिती होती.
सचिन बिद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *