महसूल प्रशासन कारवाई करते की पाठीशी घालते?

पुणे : इंदापूर तालुक्यातील टणु येथील चव्हाणवस्ती स्थित भीमा नदीकाटी माती उत्खननचा गोरखधंदा गावातील तलाटी व कोतवाल यांच्या राजाश्रयाने सुरु असल्याचे चित्र सध्या पंचक्रोशीत पहायला मिळत आहे. तालुक्याचे नुतन तहसिलदार यानी नदी लगतच्या वाळू,माती उपसा करणाऱ्या बेलगाम वाहतूकीवर लगाम घालण्याचे मोठे आव्हान आता समोर असणार आहे.

तालुक्यातील टणु-टाकळी मार्गावरील चव्हाण वस्ती येथे भीमा नदीकाठी दिवसाढवळ्या माती उत्खनन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.अवैद्य उत्खनन करत उपसा करणारे व वाहतूक करणाऱ्या कृत्यावर कारवाई करण्यात स्थानिक तलाटी आणि मंडलाधिकारी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. हा गौण खनिज माती उत्खननाचा गोरखधंदा कोतवालपासून ते वरिष्ठांपर्यंत लागेबांधे असल्याने सुरू असल्याची खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. शासनाच्या लाखो रुपयांचे महसूलचा दिवाळा काढणाऱ्या कोतवाल तलाठी व मंडलाधिकारी बरोबरच माती उपसा करणाऱ्यावर महसूल प्रशासन कारवाई करते की पाठीशी घालते ? हे पाहण्यास स्थानिक ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *