बुलडाणा : मलकापूर येथील प्रशस्त त्रीरत्न बुध्दविहारात भगवान बुध्दाच्या भव्य मुर्तीची प्रतिष्ठापणा बुध्द गया चे भंते महास्थवीर विशुदानंद बोधी व संघाद्वारा विधीवत करण्यात आली.मा.नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या तिन वर्षाच्या अथक प्रयत्नातून या विहाराच्या संकल्पपूर्तीचा सोहळा भिमनगर येथे बुध्द मुर्ती स्थापनेने साजरा करण्यात आला.
सदर बुध्दविहार निर्माणासाठी विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,तत्कालीन आमदार श्री चैनसुखजी संचेती यांच्या स्थानिक विकास निधीचे सहकार्य लाभले. प्रतिष्ठापणा करण्यात आलेली बुध्द मुर्ती मुरादाबाद येथून एक लक्ष साठ हजार रुपयाची असून भारतीय आशीर्वाद मुद्रा असलेली आहे.माजी फौजदार श्री रमेश धंदर यांचे मार्फत ती मागविण्यात आली. यासाठी स्थानिक बौद्ध उपासक,उपासिकांनी आर्थिक योगदान दिले. आयुष्यमान कुणालभाई वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजिलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दौलतराव मोरे औरंगाबाद हे होते तर प्रमुख उपस्थितीती म्हणून माजी आमदार श्री चैनसुख संचेती,माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख,भारतीय स्टेट बँकेचे माजी सर व्यवस्थापक ॲड.अरूण इंगळे,”समतेचे निळे वादळ” जिल्हा अध्यक्ष अशोक दाभाडे,मलकापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक राजदेव,सदूरामल आहुजा,मुकेश ललवानी,अनिल आहुजा,विशाल मदवानी,अनिल झोपे,अरूण अग्रवाल,जी.डी.झनके,डॉ ढाले,प्रा.भोगे,हरीभाऊ इंगळे,वाय.के.मोरे,दिलीप इंगळे,मोहन खराटे,रविचंद टाक,डी.के.टाक,मानसिंग सारसर,दिपक मेश्राम,रवि भारसागळे,सुरेश इंगळे,राजेश जाझोट आदी सह भिमनगर व परिसरातील असंख्य नागरिक,उपासक- उपासिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सुरूवातीला बुध्दमुर्तीची भव्य मिरवणुक बुध्दं शरणं गच्छामी च्या धीर गंभीर आवाजात श्वेत वस्त्र परिधान केलेल्या उपासक-उपासिकांनी शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आली.संपूर्ण रस्ता गुलाब पुष्पांनी आच्छादला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी.एन.सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन धम्मदास वानखेडे यांनी केले.श्री रविंद्र इंगळे यांनी सपत्निक अकरा भिक्षुना कठीण चिवरदान केले. विहाराच्या निर्मिती व बुध्दमुर्ती स्थापनेसाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल अशांतभाई वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.समुहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.