फुलचंद भगत
​वाशिम:-आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने, शासकीय स्तरावर कामांचा मोठा उरक सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात कामकाज सुरु होते.विविध विकासकामांचा निधी आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त दिसून आले.
मार्च महिना अखेर असल्याने विकासकामांचा निधी वेळेत खर्च करण्यासाठी आणि नियोजित कामे पूर्ण करणे आवश्यक असते. हीच बाब लक्षात घेऊन वाशिमचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौहान(भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यालयातील कामकाज सुरू ठेवण्यात आले.

साधारणपणे शनिवारी, रविवारी शासकीय सुट्टी असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट असतो, मात्र शनिवारी आणी रविवारीही वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागात चित्र वेगळे होते. मार्च एंडिंगच्या ताणामुळे विकासकामांची देयके काढणे, प्रलंबित फाईल्सचा निपटारा करणे, नियोजित निधीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व कर्मचारी सकाळपासूनच कामावर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *