धर्माबाद  तालुक्यात पाटोदा थडी येथून गट क्रमांक 6 मधून रॉयल्टी च्या नावाखाली गोदावरी नदी काटची माती उत्खनन होत आहे.
सदरिल वाहतूक करणारे हयवा 10 ते 15 हायवाच्या सहाय्याने सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत गोदावरी नदीकाठची काळी माती वाहतूक  होत आहे.
गोदावरी नदीकाठची  मातीचे उत्खनन माफीयांनी मोठ्या प्रमाणात पाटोदा थडी येथून रॉयल्टीच्या नावाखाली अवैध उत्खनन सुरु केले आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून काहींनी राजरोसपणे माती रात्रंदिवस उतखणन करत आहे. व माती चोरी करुन दिवसाढवळ्या  विक्री करत आहेत. एक हवा सात ते आठ हजार अर्जापूर, सुलतानपूर वीट भट्टी वाल्यांना  विक्री करत आहेत ह्याकडे  तलाठी व मंडळ अधिकारी यांचे जाणीवपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे. या प्रकरणाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना कुठलीच कारवाई होत नाही. विशेषतः या पाटोदा थडी गट क्रमांक 6 येथून गोदावरी काठावरची काळी माती रॉयल्टी च्या नावाखाली दिवस-रात्र दोन मोठ्या पोकलेनच्या साह्याने उत्खनन होत आहे अवैध उत्खनन व वाहतुकीत तलाठी व मंडळ अधिकारी अप्रत्यक्ष माफीयांना मदत करत आहेत.
माति चोरट्यांनी मोठा उच्छाद मांडला असून  बिलोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या अर्जापूर ,सुलतानपूर , माति चोरट्यांचा अड्डा बनला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून  रात्रंदिवस माति ची चोरी करुन वाहतूक करत आहेत.     धर्माबाद् तालुक्यातील गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकडे तहसीलदार व त्यांची यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे महसूल विभागात वरपासून ते खालपर्यंत भ्रष्टाचाराची गटारगंगा जोरात वाहत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीत कोण कोण आहेत आणि त्यांना पाठबळ कोण देतय याची चर्चा तालुकाभर होत आहे.
धर्माबाद तालुक्यात होत असलेल्या माती मुरूम व वाळूच्या अवैध वाहतुकी संदर्भात तहसीलदार सुरेखा स्वामी म्यॅडम  यांना माहिती दिली असता ते केवळ तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांना सांगते एवढच म्हणतात पण पुढे काहीही कारवाई होत नाही. परिणामी महसूलच्या पाठींब्यावर धर्माबाद तालुक्यात रेती मुरुमाचे अवैध व नियमबाह्य प्रचंड उत्खनन करून बिनधास्तपणे वाहतूक करण्यात येत आहे. 
मंडळ अधिकारी आणि तहसीलदाराशी अर्थपूर्ण तडजोडी करुन राक्षसी पध्दतीने हजारो ब्रास रेती मुरुमाचे नियमबाह्य व अवैध उत्खनन करण्यात असल्याने धर्माबादच्या तहसीलदार स्वामी यांची आता वादग्रस्त तहसीलदार अशी प्रतिमा तयार होत आहे. तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.धर्माबाद तालुक्यात मागच्या एक महिण्यापासून  रेती मुरुमाच्या अवैध उत्खनन व वाहतुखीचा गोरखधंदा सुरु आहे. पुर्वी रात्रीला लपूनछपून चोरी करण्यात येत होती. मात्र मागच्या काही दिवपासून अवैध रेती मुरुमाची दिवसाच वाहतूक होत आहे. महसूल विभागाने मुक समंती दिल्यामुळे राक्षसी पध्दतीने रेती मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वाहतूक होत आहे. महसूल विभागाच्या मौनवृती मुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे.
                       चौकट
जिल्हाधिकारी यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी महसूल बुडवणारया माफीयासाठी तालुक्यात विशेष पथकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *