नांदेड विधान परिषद निवडणुक मध्ये रंग भरत असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष व इतरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर तर महायुतीकडून अमरनाथ राजूरकर वंचित कडून प्रशांत इंगोले या तिघांमध्ये तिरंगी लढत होत आहे
जिल्ह्यामधील 452 मतदार मतदानाचा हक्क बजावणारा असून नांदेड विधान परिषदेसाठी मतदान करणार आहे
विधान परिषद निवडणूक तिरंगी होत असून त्यामध्ये अमरनाथ राजूरकर. कृष्णा पाटील आष्टीकर या दोघांमध्ये लढत होत आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजितदादा गटाकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन महायुतीचा धर्म पाळण्यासाठी प्रवीण पाटील चिखलीकर यांची उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला आहे .
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी पक्षश्रेष्ठीचा आदेश पाळत आपली उमेदवारी मागे घेत कृष्णा पाटील अष्टीकर यांना पाठिंबा दिला आहे

नांदेड विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होत असून यामध्ये महानगरपालिका नगरपालिका यांचे नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होऊन तिरंगी लढत होत आहे
मागील निवडणुकीमध्ये अमरनाथ राजूरकर यांनी बिनविरोध निवडून येऊन निवडणूक जिंकली होती
परंतु या निवडणुकीमध्ये कृष्णा पाटील अष्टीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरले आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशांत इंगोले यांनी आपले उमेदवारी मागे न घेता त्यांनी निवडणूक रिंगणात उतरलेत आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होत होत असून अमरनाथ राजुरकर विरुद्ध कृष्णा पाटील अष्टीकर या दोघांमध्ये लढत होत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रंग भरताना दिसत आहे

.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश पाळावा नगरसेवकांना सली वर्ण घेऊन जातात त्यांना घरीच राहू द्यावे मोदीजींनी सांगितले संदेश त्यांनी पळून बचतीचा मार्ग अवलंबावा असाच मोठा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रसार माध्यमांसमोर महायुतीच्या उमेदवारांना दिला आहे.
कंधार प्रतिनिधी शेख शादुल
