उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानातील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर घडलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले.
हल्द्वानी येथील रामलीला मैदानात खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली होती. सभेनंतर काही सनातनवादी आणि भाजपप्रणित संघटनांच्या लोकांनी स्टेजवर जाऊन गोमूत्र शिंपडून मंत्रपठण करत शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते यांच्या नेतृत्वाखाली मुंडन आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, नांदेड शहराध्यक्ष संजय कवठेकर तसेच नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा देगलूर येथील नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे उपस्थित होते.
