संगीत साधना मंच प्रस्तुत सुनहरी यादें गीतांचा कार्यक्रम 27/09/2027 रोजी संपन्न झाला . डॉ. सुनील जाधव व सुवर्णा केळगिरे , विजय बंदमवार व ललिता डुलगच यांनी सादर केलेल्या गीतांना देगलूरकर टाळ्यांचा प्रतिसाद देत मंत्र मुग्ध झाले. लक्ष्मीकांत पदमवार, नंदकुमार शाखावर , बबलू टेकाळे संजय चीनमवार , दत्तु अण्णा जोशी , महेश पाटील , बाबुराव उप्पलवार यांच्या उपस्थिती मधे सरस्वती पुजन होऊन आरंभ झाला .
विजय बंदमवार यांनी सुत्र संचालन केले . डॉ सुनील जाधव यांनी आभार प्रदर्शन केले . मोठ्या संखेने उपस्थित देगलूरकर रसिकांनी विजय बंदमवार , ललिता डुलगच , डॉ. सुनील जाधव, लक्ष्मण अम्रुतवार , गोविंद सुवर्णकार , सुरेश देशमुख , सुवर्णा केळगिरे , संजय मोतेवार बलराज पटणे यशवंत काबदे आदी सर्व कलाकारांच्या गायनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी झाला .
