CH.SAMBHAJINAGAR| वाळूज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आझाद समाज पार्टीच्या वतीने अभिवादन सभा आणि भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
voice:
कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा पार पडली. यावेळी कैलास गायकवाड, साहेबराव दाभाडे, राजू निकाळजे, नवाब पटेल आणि अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चव्हाण आणि विक्रम ढेरे यांनी उपस्थितांना आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे, बौद्धाचार्य अर्जुन पठारे यांनी त्रिशरण पंचशील गाथा सादर करून कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले असून, या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपासक-उपासिका आणि धम्म बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी वीर, विजय शिनगारे, साळवे, सुराशे आणि भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.


अमोल पारखे,

गंगापूर, वाळूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *