मनोहर तावरे

मोरगाव : बारामती तालुक्यातील ‘सुपा’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करण्यात आलीय. यापुढे ही मोहीम चालूच करणार असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितले. नागरिकांनी आज झालेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरगाव परिसरातील आंबी रोड, मोरगाव गावठाण तसेच भोंडवे वाडी या विविध भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करून हातभट्टी दारू व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. येथे हातभट्टी दारूची विक्री बेकायदेशीर होत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी होत्या. कायमस्वरूपी हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असतील याची गंभीर दखल घेण्यात आली
सुपा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवत विविध ठिकाणी अचानक छापे टाकले. यावेळी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रसायने तसेच तयार दारू जप्त करण्यात आली. काही ठिकाणी दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेली साधनेही पोलिसांनी नष्ट केली असल्याची माहिती मिळाली.
या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. गावांमध्ये वाढत चाललेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर सुपा पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितले की, “हद्दीतील बेकायदा हातभट्टी दारू व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यापुढे अशा प्रकारे दारू विक्री अथवा निर्मिती करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. बेकायदा व्यवसायाबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.”
सुपा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस शिपाई संतोष जावीर सह पोलिस हवालदार राहुल भाग्यवंत ,पो.ह. पवार तुषार जैनक यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोरगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
चौकट
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा व्यवसाय आटोक्यात आणले .
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सुपा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अनेक धडाकेबाज कारवाई केल्या आहेत. गेल्या आठवड्यात मोरगाव येथे चक्री जुकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. आजही झालेल्या कारवाईमुळे बेकायदा व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कायमस्वरूपी पोलिसांची गैरव्यवसायिकांवर दहशत राहावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *