• यावल-पिंप्री रस्त्यालगत मृतदेह आढळला
  • पाटाच्या पाण्यात पुरुषाचा मृतदेह
  • मृताचे अंदाजे वय ३० ते ३५
  • हातावर ‘RAMESH’ नावाचे गोंदण
  • मृताची अद्याप ओळख पटलेली नाही
  • यावल पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

JALGAON | यावल पोलीस स्टेशन हद्दीत यावल ते पिंप्री जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पाटाच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, यावल पोलिसांनी नागरिकांना ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.

दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता हा मृतदेह आढळून आला. मयताचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे, उंची अंदाजे १६५ सेंटीमीटर, रंग निमगोरा असून चेहरा गोल आहे. कमरेला काळ्या रंगाचा करदोडा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजी अक्षरात “RAMESH” असे गोंदविलेले असून उजव्या हाताच्या दंडावर धागा बांधलेला आहे. अंगात तपकिरी रंगाची Best Shot कंपनीची अंडरवेअर आहे.
सदर मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. वरील वर्णन व छायाचित्रावरून सदर इसमाबाबत कोणास माहिती असल्यास अथवा कोणाची व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी यावल पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *