ऑन नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर

- राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहे. नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांनीही सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे.
- काल मुख्यमंत्री पुण्यात होते. पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्या गाड्यांचा ताफा किती मोठा आहे, याचा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर प्रसारित केला. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री मोटरसायकलवर दुचाकीने मंत्रालयात गेले, मात्र त्यासाठी पोलिसांनी संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला. भाजीवाले, फळविक्रेते, फुलविक्रेते, पेपरविक्रेते यांना हटवण्यात आले. पदपथावरूनही कोणालाही चालू दिले जात नव्हते. मी हे स्वतः सांगत नाही, लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी आहेत.
- Bharatiya Janata Party ने या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडले पाहिजे. राष्ट्र संकटात आहे, हे तुम्हाला निवडणूक संपल्यानंतर कळाले का? महागाई वाढणार आहे, हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर समजले का?
- Rahul Gandhi यांनी याचे भाकीत केले होते. आम्हीही सांगत होतो की निवडणूक संपल्यानंतर नरेंद्र मोदी देशावर आर्थिक संकटाचा बॉम्ब टाकतील. मोदी सध्या सात युरोपीय राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला परदेशात जाऊ नका असे सांगितले जाते, पण ते स्वतः परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मंत्र्यांचेही दौरे सुरू आहेत.
- मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, पण आम्ही म्हणतो ‘ट्रम्पनिर्भर भारत’.
ऑन पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर :
- Devendra Fadnavis यांचे विधान पूर्णपणे बिनडोक आहे.
- जर हा सगळा धोरणाचा भाग होता, तर इराण-इस्त्रायल युद्धावर किंवा अमेरिकेच्या दबावावर सरकारने भूमिका का घेतली नाही?
- भारताने अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घ्यावा, ही कोणती रणनीती आहे?
ऑन Supriya Sule यांच्या प्रतिक्रियेवर
- दोन-चार पोलीस कमी करणे आमच्या हातात नाही. पण इतके मोठे ताफे घेऊन फिरण्याची गरज आहे का? मोदींनी किंवा Amit Shah यांनी त्यांचा ताफा कमी केला का? हा माझा प्रश्न आहे.
ऑन राष्ट्रवादीतील घडामोडींवर
- Ajit Pawar यांचा पक्ष हा मूळ पक्ष नाही. मूळ पक्ष Sharad Pawar यांचाच आहे.
- तसेच Uddhav Thackeray यांचाच मूळ पक्ष आहे.
ऑन Praful Patel, तटकरे आणि शरद पवार भेटीवर
- ही त्यांच्या कर्माची फळे आहेत. अजित पवार यांचे डोके फिरवण्यात जे लोक पुढे होते, त्यांनाच आज त्याची फळे भोगावी लागत आहेत.
ऑन ३० तारखेच्या सुनावणीवर
- जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमची भूमिका मांडत राहू.
- निवडणूक आयोगाने दबावाखाली नव्हे, तर घटनेनुसार निर्णय दिला पाहिजे.
ऑन NEET Examination प्रकरणावर
- नीट पेपरफुटी प्रकरणातील अटक झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा भाजपशी संबंध आहे.
- इतके मोठे षड्यंत्र आणि एवढी मोठी चोरी सत्ताधाऱ्यांच्या पाठबळाशिवाय होऊ शकत नाही.
- यूपीएससी, नीट, सीईटी, विद्यापीठे अशा अनेक संस्थांमध्ये भाजपची माणसे बसवली आहेत. त्यामुळे नीट पेपरफुटीला भाजपच जबाबदार आहे.
