जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांचे विचार सर्वांना कळावे यासाठी एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे बाळापूर नगरीत उत्सव मंगल कार्यालयात दिनांक 17 मे 2026 रोजी फुले-आंबेडकर विद्वत सभा बाळापूर व दि बुध्दिष्ट चँरिटेबल ट्रस्ट बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या धम्म परिषदेला जागतिक किर्तिचे डॉ. भदंत हर्षबोधी महाथेरो संभाजीनगर व त्यांच्या सोबत पूज्य भंते गुणरत्न महाथेरो, भंते धम्मशरण महाथेरो,भंते सुमंगल महाथेरो, भंते श्रीलाभ थेरो, भंते स्वरानंद थेरो यांची मंगल उपस्थिती होती. यांच्या धम्मदेसनेचा लाभ व त्यांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंच दर्शन बाळापूरातील जनतेला दिल्याने ही धम्मपरीषद ऐतिहासिक ठरली.
या धम्मपरिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे विभागीय समन्वयक प्रा.सिध्दार्थ देवदरीकरसर,महाराष्ट्र राज्याचे वंचित बहूजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव श्री. राजेंद्र पातोडे.प्रसिद्ध वक्त्या अँड.वैष्णवी हागोणे मँडम यांची उपस्थिती लाभली होती.या वक्त्यांच्या विचारांचा लाभ जनतेला मिळाला.
बाळापूर नगरीमधे धम्मपरीषद व्हावी यासाठी प्रमुख आयोजक फुले-आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष माजी प्राचार्य पंजाबराव भिलंगे सर व प्रा दिपक तायडे सर तसेच दि बुध्दिष्ट चँरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अँड प्रशांत उमाळे ,संजय उमाळे, देवेंद्र सुरवाडे, युवराज डोंगरे,अँड प्रविण अंभोरे, सागर उपर्वट,अशोक तायडे, प्रकाश उमाळे, दादाराव गाडेकर,नाजूक वानखडे तसेच विद्वत सभेचे दिलिप इंगळे, अँड. प्रकाश वानखडे, प्रा.प्रेमराज डोंगरे,मनोहर इंगळे, राजेंद्र इंगळे,नागसेन अंभोरे, प्रकाश तायडे, जितेंद्र उमाळे, प्रमोद इंगळे,जयवर्धन डोंगरे.तसेच प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्य महिला मंडळ, नवयुवक मंडळांची उपस्थिती लाभली.
