आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर: पुतळा सुशोभीकरणाचे भूमिपूजन
प्रतिनिधी, कंधार
ऐतिहासिक कंधार शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या पुतळ्यामुळे कंधार शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सोमवारी, दि.१८ मे रोजी दुपारी २ वाजता पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गंगाधर तोगरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न.प.चे मुख्याधिकारी संदीप भोळे, उपनगराध्यक्ष अब्दुल मन्नान, चिखली गावचे माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, नगरसेवक जफरोद्दिन बाहोद्दिन, स्वप्निल लुंगारे, महेश पिनाटे, पिंटू कदम, समीर चाऊस, नगरसेवक प्रतिनिधी शेख आसेफ, सुहास कांबळे, कैलास कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी मन्नू सेठ, लोहा न.प.चे नगरसेवक सतिश निकाते, ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, भगवान राठोड, राजकुमार केकाटे, मधुकर डांगे, अनिल बोरगावकर, अंकुश कदम, मारोती गायकवाड, सतिश निकाते, धनराज लुंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले, मी सर्व महापुरुषांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी दिली आहे. महापुरुषांच्या नावाला शोभेल असे सुशोभीकरणाचे काम होणार आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे कोणीही राजकारण करु नये.
यावेळी माजी पं.स.सभापती प्रतिनिधी पंडितराव देवकांंबळे, माजी पं.स.सदस्य रामभाऊ देवकांबळे, खरेदी विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, कृउबा समितीचे संचालक गिरीश मामडे, फुलवळ गावचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते मयूर कांबळे, सचिन बसवंते, विद्यासागर वाघमारे, विलास वाघमारे, संभाजी गडबे,
आदींसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कांबळे यांनी केले. तर आभार नगरसेवक प्रतिनिधी जफरउल्ला खान यांनी मानले.
