चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा ०२ तासांत उघडकीस आणून आरोपीस अटक
एकूण १०,००,०००/- रू. चा मुददेमाल जप्त
फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक २४/०५/२०२६ रोजी फिर्यादी मोहम्मद तस्लीम मोहम्मद कदिर, वय ४५ वर्षे,रा. गैबीपूरा, रिसोड, जि.वाशिम यांनी जबानी रिपोर्ट दिला की, फिर्यादीकडे एक फोर्स कंपनीचे
पांढऱ्या रंगाचे वाहन ज्याचा क्रमांक एम. एच. १२ एच.बी. २९२९ असे असून सदरचे वाहन हे त्यांचे बस स्टॅण्ड रिसोड समोरील टाटा महिंद्रा नावाचे गॅरेजवर रात्रीचे उभे करून ठेवतात. दिनांक
२३/०५/२०२६ रोजी रात्री ११.०० वा. यांनी त्यांचे पांढऱ्या रंगाचे १७ सिटर फोर्स कंपनीचे वाहन क्रमांक एम.एच.१२ एच बी २९२९ किं.अं.१०,००,०००/- रू. हे गॅरेजसमोर लावून उभे करून ठेवले होते. त्यानंतर दिनांक २४/०५/२०२६ चे सकाळी ०७.०० वा. च्या सुमारास फिर्यादी यांनी गॅरेजवर जावून पाहणी केली असता त्यांना त्यांचे वाहन दिसून आले नाही. दिनांक २३/०५/२०२६ रोजी रात्री ११.०० वा. ते दिनांक २४/०५/२०२६ चे सकाळी ०७.०० वा.दरम्यान फिर्यादी यांचे पांढऱ्या रंगाचे १७ सिटर फोर्स कंपनीचे वाहन क्र. एम. एच. १२ एच. एच बी २९२९ किं.अं. १०,००,०००/- रू. हे वाहन बस स्टॅण्ड समोरील फिर्यादीचे मालकीचे टाटा महिंद्रा नावाच्या गॅरेजसमोर उभे असतांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे.’ अशा फिर्यादी यांचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रिसोड येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम
३०३(२) बीएनएस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांनी डी. बी. पथकास दिल्या होत्या. त्यानंतर
डी.बी. पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी सीसीटीव्ही, तांत्रिक पध्दतीच्या माध्यमातून व गुप्त
बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा शोध घेतला व सदर गुन्हयात आरोपी नामे आशुतोष लक्ष्मण आकले, वय २२ वर्षे, रा. काळे फाईल, ता. जि. वाशिम यास वाशिम नाका,रिसोड येथून ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली व त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले एक पांढऱ्या रंगाचे १७ सिटर फोर्स कंपनीचे वाहन क. एम.एच. १२ एच. बी. २९२९ किं.अं. १०,००,०००/- रू. जप्त करण्यात आले आहे. रिसोड पोलीसांच्या या कामगिरीमूळे गुन्हयातील फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला व काही तासांत गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करून मुददेमाल हस्तगत
केल्याने त्यांनी पोलीसांचे कौतूक केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील (IPS),अपर
पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड,सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम ननवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी. बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, रामेश्वर नागरे, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू,पोलीस अंमलदार विनोद घनवट, परमेश्वर भोणे, रवि अढागळे, राजेश गांगवे यांनी केली आहे.
