रायगडच्या खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील मुख्य पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही भाग ढासळल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तुकसई गावासह पुढील वाड्या-वस्त्यांना जोडणारा हा महत्त्वाचा आणि मोठ्या वर्दळीचा पूल आहे. मात्र पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही भाग ढासळल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुलाची पाहणी करून डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
