♦️ फैजपूर साखर कारखान्यासमोर भीषण अपघात
♦️ दहिगावच्या मिथुन गायकवाड यांचा मृत्यू
♦️ रात्री दहाच्या सुमारास घडली दुर्घटना
♦️ अज्ञात मोटरसायकलला धडक झाल्याची माहिती
♦️ सोबतचे दोन तरुण घटनास्थळावरून निघून गेले
♦️ यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

JALGAON | यावल तालुक्यातील दहिगाव येथील ३५ वर्षीय तरुणाचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला.

दहिगाव येथील मिथुन अशोक गायकवाड, वय ३५ वर्षे, हे त्यांच्या दोन तरुण मित्रांसह फैजपूरकडून यावलकडे मोटरसायकलने येत होते.
मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्त्यावर त्यांच्या मोटरसायकलची एका अज्ञात मोटरसायकलशी धडक झाल्याची माहिती आहे. या अपघातात मिथुन गायकवाड खाली कोसळले. त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसलेले दोन तरुण घटनास्थळावरून निघून गेले, तर दुसरी अज्ञात मोटरसायकलही तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर फैजपूर येथील नागरिकांनी मिथुन गायकवाड यांना तत्काळ डॉक्टर खाचणे यांच्या हॉस्पिटलसमोर आणले. त्यानंतर त्यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती जगदीश गायकवाड यांनी यावल पोलिसांना दिली असून, त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | दहिगाव, यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *