जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ७५० हून अधिक अनाथ चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
मंत्री गुलाबराव पाटील मित्र परिवार, मनोज चौधरी मित्र परिवार आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनाथ मुलांच्या शिक्षणाला हातभार लावत त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले.
