सांगवी, ता. यावल येथे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शास्त्री गोविंदराज राजघरबाबा यांचा रिक्षाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सांगवी–फैजपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात लोखंडी पाइप पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

शास्त्री गोविंदराज राजघरबाबा रिक्षाने फैजपूरकडे जात होते. सांगवी–फैजपूर रोडवरील पंपाजवळ रिक्षाचालक अमोल मिस्तरी याने रिक्षात पेट्रोल भरले. त्यानंतर चिंच्याच्या झाडाजवळ रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीवर जाऊन धडकली.

या भीषण धडकेत रिक्षेतील लोखंडी पाइप शास्त्रीजींच्या पोटात घुसला. अपघातानंतर पाइप बाहेर काढण्यात आला; मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना फैजपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉ. चंद्रसेन चौगुले यांनी त्यांना मृत घोषित केले.

गोपाळ शास्त्री यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.

शास्त्री गोविंदराज राजघरबाबा यांच्या पार्थिवावर १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी राज्यातील महानुभाव पंथातील प्रमुखांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

प्रतिनिधी : फिरोज तडवी | NTV न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *