• ६६ हजार १४७ शेतकऱ्यांना कर्जमाफी
  • शासनाकडून ६२७ कोटी रुपये जमा
  • १ लाख ५ हजार २२८ कर्जदारांचे प्रमाणीकरण
  • आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर राज्यात अव्वल
  • ११ हजार २८४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी
  • योजनेची प्रक्रिया वेगाने सुरू


AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटी ४७ लाख रुपयांची कर्जमाफी योजना वेगाने मार्गी लागत आहे. शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाली असून, आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमधील १३६६ सोसायट्यांच्या थकबाकीदार ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी शासनाकडून ६२७ कोटी ४७ लाख रुपये जमा झाले आहेत.

शासनाकडून प्राप्त पहिल्या यादीतील १ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी १ लाख ५ हजार २२८ जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर मृत्यू, ॲग्रीस्टार फार्मर आयडी नसणे, परगावी किंवा स्थलांतरित असणे आणि बायोमेट्रिक न होणे अशा कारणांमुळे ११ हजार २८४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे.

पात्र सभासदांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी बँक आणि संस्थांमार्फत पाठपुरावा सुरू आहे. मृत सभासदांच्या कर्ज खात्यांना वारस नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर जिल्हा अव्वल ठरल्याबद्दल जिल्ह्यातील सचिव, बँक कर्मचारी, तालुका सहनिबंधक, लेखापरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

| एनटीव्ही न्यूज मराठी | जामखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *