- धोंडाबाई सगर यांचे दुःखद निधन
- प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९६व्या वर्षी निधन
- स्वातंत्र्य सेनानी गणपतराव सगर यांच्या पत्नी
- राजू सगर यांच्या आईचे निधन
- हुतात्मा स्मारकाजवळ अंत्यविधी संपन्न
- नागरिकांची अंत्यसंस्काराला मोठी उपस्थिती
DHARASHIV | उमरगा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि स्वातंत्र्य सेनानी कै. गणपतराव सगर यांच्या पत्नी तथा शासकीय कंत्राटदार राजू सगर यांच्या आई धोंडाबाई गणपतराव सगर यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या.
धोंडाबाई गणपतराव सगर यांचे दि. २० रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उमरगा येथील हुतात्मा स्मारकाजवळील स्मशानभूमीत दि. २१ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न झाला. या अंत्यसंस्कार प्रसंगी उमरगा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एनटीव्ही न्यूज मराठी | उमरगा, धाराशिव
